• “आईचं दूध झालं परकं”

    जन्मताच उडालं मायेचं छप्पर,सोडून गेला देह.पोरके झाले नवजात अर्भक,आईचं दूध झालं परकं.काय त्या लेकरांचा अपराध? कोठे शोधेल मायेचा पदर?पोटात जाणारा हात गेला अंधारात,भूक कशी मिटेल?चिमणी गेली उडून भूर,पाखराला चारा आणून देईल कोण? आई म्हणून कोणाला मारेल हाक,कोणाच्या कुशीत झोपेल बाळ?अंगाई नाही पडली कानी,कशी लागेल गाढ झोप?किती रडेल झोपेतून उठल्यावर,कवेत घ्यायला नसेल माय. शिकवेल कोण पाटी गिरवायला,कोण असेल शाळेत सोडायला?जीवनाचं सार सांगेल कोण?हरपले कौतुकाचे बोल.चूक झाल्यावर ना कोणी ओरडायला,मारले कोणी तर नाही भांडायला. कोण असेल खाऊ द्यायला,वाढदिवसाच्या दिवशी ओवाळायला?जन्मताच सोडून गेली,नजरेत नाही पडला चेहरा.कसा करेल वाढदिवस साजरा?जन्मताच गेलास्मशानात आईला सोडायला. निघाला हुंदक्यावर हुंदका,किती वाहिल्या असतील धारा…जन्म दिला तिनं—केला गुन्हा काय?लेकराला सोडून…

  • “संशयाच्या ठिणगीने उजाडलेलं घर…”

    ह्याला तिच्यावर संशय, तिलाही त्याच्यावर संशय,दोघांच्या मनागूटावर होतं संशयाचं भूत.तो पिऊन बडबडायचा, तीला न पिताच चढायची,मग काय — रात्रभर दोघांचा वादविवाद,पोरं मात्र उपाशी तशीच झोपायची. नेहमीच असायचे ह्यांचे आरोप-प्रत्यारोप,पण आज वाद भलताच पेटला.दोघांनीही उडवले चारित्र्यावर शितोडे,शाब्दिक शस्त्राने लुटली इज्जत,एकमेकांच्या फोनची केली तपासणी,घरातल्या वस्तूंची तोडफोड केली,अक्षरशः शेवटी आज हातापाई झाली. दोघांनीही संपूर्ण रात्र जागून काढली,अपशब्दांनी मुलांच्या मनावर झाला घात.त्यांना नव्हतं समजत — कशामुळे होतोय वाद.सकाळ झाली, पण घरात अंधार तसाच राहिला. तोही बिना डब्याच्या निघून गेला कामाला,उपाशी मुलांनी चहा आईकडे मागितला,तीने अंगावरील माराचे वणं कसेबसे लपवले,मुलांना घेऊन सरळ माहेर गाठले. त्यानेही सायंकाळी दारूचा अड्डा पकडला.लग्नापूर्वीचं प्रेम आणि प्रेमानंतरचं लग्न,दोघांच्या सहमतीने थाटला…